नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9595882733 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , Bhagwant Mann Cabinet : भगवंत मान यांची टीम ठरली, 10 मंत्र्यांची यादी जाहीर – 24NTV News Marathi

24NTV News Marathi

Latest Online Breaking News

Bhagwant Mann Cabinet : भगवंत मान यांची टीम ठरली, 10 मंत्र्यांची यादी जाहीर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

नवी दिल्ली: पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या होणार आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित पंजाबच्या कॅबिनेटमध्ये (Cabinet Expansion) समावेश असणाऱ्या नेत्यांना शपथ देतील. शपथविधीचा कार्यक्रम उद्या सकाळी 10 वाजता चंदीगडमध्ये होईल. मंत्रिपदाची शपथ 10 नेत्यांना दिली जाणार आहे. आपच्या 10 नेत्यांची नावं जाहीर झाली आहेत. आपककडून हरपाल सिंग छिमा, डॉ. बलजीत कौर, हरभजन सिंग ईटीओ, विजय सिंगला, गुरमीर सिंग मीत हैर, हरज्योत सिंग बैन्स, लाल चंद कतरुछक, कुलदीप सिंग दहिवाल, ललजित सिंग भुल्लर, ब्रम शंकर या नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. मंत्रिपदाचा शपथविधी झाल्यानंतर दुपारी 12.30 मिनिटांनी कॅबिनेटची पहिली बैठक होणार आहे.

कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार?

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि नवनिर्वाचित आमदारांना पंजाबच्या 16 व्या विधानसभेचे सदस्य म्हणून शपथ देण्यात आली आहे. राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन देखील सुरु झालं आहे. प्रोटेम स्पीकर म्हणून इंदरबीर सिंह निज्जर यांनी नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. आपच्या आमदारांमध्ये अनेक जण पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून आपचे भगवंत मान यांनी शहीद भगतसिंग यांच्या गावात शपथ घेतली होती. आता त्यांच्या सोबत आता 10 आमदारांना मंत्री म्हणून शपथ देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री झाल्यावर घेतलेल्या पहिल्या बैठकीत मान काय म्हणाले?

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांनी पहिल्या बैठकीला संबोधित केलं. यासंदर्भात पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयानं माहिती दिली आहे. राज्यातील पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत लोकसेवकाप्रमाणं वर्तन ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशाद्वारे भगवंत मान यांचा नागरिक आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यातील संबंध चागंले राहावेत असा प्रयत्न दिसतो. नवी दिल्लीत देखील आपची लोकप्रियता वाढण्याचं देखील एक कारण होतं.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

आणखी कथा

तुमची चुकली असेल