नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9595882733 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुलांच्या लसीकरणावेळी या 5 गोष्टी करा, दुष्परिणामांपासून संरक्षण मिळवा – 24NTV News Marathi

24NTV News Marathi

Latest Online Breaking News

मुलांच्या लसीकरणावेळी या 5 गोष्टी करा, दुष्परिणामांपासून संरक्षण मिळवा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भारतात 16 मार्चपासून, 12-14 वर्षे वयोगटातील मुलांनाकोविड-19 लस मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यांना कोरोना लसीचा (Covid-19 vaccine)पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच दुसरा डोस 28 दिवसांनी घेतला जाईल. आतापर्यंत फक्त 15 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच कोरोनाची लस दिली जात होती. मुलांना ‘कॉर्बेवॅक्स’(Corbevax vaccine) लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लसीकरण करण्यासाठी कोवीन (Cowin) पोर्टल किंवा आरोग्य सेतू मोबाईल अॅपवर नोंदणी करता येईल. लसीकरण केंद्रावरही मुले नोंदणी करू शकतात. लसीकरण केल्याने कोरोनामुळे गंभीर आजार आणि मृत्यूचा धोका कमी होतो. जगभरातील अनेक देशांमध्ये लहान मुलांसाठी लसीकरण फार पूर्वीपासून सुरू झाले आहे. लसीकरणानंतर अनेकदा काही किरकोळ लक्षणे दिसून येत असतात. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने काही सूचना केल्या आहेत, ज्याद्वारे लसीच्या दुष्परिणामांना अधिक चांगल्या प्रकारे सामना करता येईल.

मुलांशी लसीबाबत चर्चा करा

वेदनांमुळे मुलांना नेहमीच लसीकरण करण्याची भीती वाटत असते. परंतु लसीकरणाशिवाय सध्या कोरोनापासून संरक्षण करण्याचे दुसरे कुठलेही माध्यम नाही. मुलांना लसींचे फायदे सांगा, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना लसीकरणासाठी तयार करा.

डॉक्टरांशी बोला

तुम्हाला लसीकरणाबद्दल काही प्रश्न असल्यास, तुमच्या डॉक्टरांना विचारा. तुमचे डॉक्टर तुम्हाला लसीबद्दल संपूर्ण माहिती देऊ शकतात. हे तुम्हाला लसीचे फायदे आणि दुष्परिणाम समजण्यास मदत करू शकतात.

दुष्परिणामांबद्दल जाणून घ्या

काहीवेळा मुलांनी लस घेतल्यानंतर किरकोळ दुष्परिणाम होऊ शकतात, ज्यात इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणे, पुरळ किंवा ताप यांचा समावेश होतो. या प्रतिक्रिया सामान्य असून याचा फार काळ त्रास होत नाही. तुमच्या डॉक्टरांकडून यासंबंधी संपूर्ण माहिती मिळवा.

दुष्परिणामांचा सामना कसा करावा

लसीकरणानंतर जाणवणाऱ्या लक्षणांचा सामना करण्यासाठी डॉक्टरांकडून संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. इंजेक्शन दिलेल्या भागावर लालसरपणा, वेदना किंवा सूज येऊ शकते. त्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला थंड आणि ओलसर कापड वापरण्याचा सल्ला देऊ शकतात.

ताप आल्यास हे करा

लस दिल्यानंतर मुलाला सौम्य किंवा जास्त ताप येऊ शकतो. त्यास सामोरे जाण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणानंतर शरीर ‘हायड्रेटेड’ ठेवा. लसीकरणानंतर 24 तासांत अन्न न जाणे हे सामान्य आहे. मुलाला नॉन-एस्पिरिन वेदनाशामक औषध देऊ शकता का? ते तुमच्या डॉक्टरांना विचारा. काळजी करण्यासारखे काही वाटल्यास डॉक्टरकडे जा.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

आणखी कथा

तुमची चुकली असेल