नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9595882733 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , AAP Punjab Govt: आप पंजाबमधून हरभजन सिंगला राज्यसभेवर पाठवणार? – 24NTV News Marathi

24NTV News Marathi

Latest Online Breaking News

AAP Punjab Govt: आप पंजाबमधून हरभजन सिंगला राज्यसभेवर पाठवणार?

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

नवी दिल्ली: आम आदमी पार्टी (AAP) क्रिकेटपटू हरभजन सिंगला (Harbhajan Singh) राज्यसभेवर पाठवू शकते. पंजाबमध्ये नुकत्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने दणदणीत विजय मिळवला. पंजाबमध्ये आपचे सरकार सत्तेवर आले आहे. हरभजन सिंगकडे क्रीडा विश्वविद्यालयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी जालंधरमध्ये क्रीडा विश्वविद्यालय बनवण्याचे आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुकीत आपला प्रचंड बहुमत मिळालं आहे. विधानसभेच्या 117 पैकी 92 जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले. हरभजन सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने आम आदमी पार्टी आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

पंजाबमधून राज्यसभेच्या पाचा जागा रिकाम्या होणार आहेत. निवडणूक आयोगाने आधीच निवडणूक तारखांची घोषणा केली आहे. आवश्यकता पडली तर 31 मार्चला मतदान होऊ शकते. राज्यसभेमध्ये आपचे संख्याबळ तीन वरुन आता आठपर्यंत वाढू शकते. पक्षाकडून लवकरच राज्यसभेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे.

मागच्यावर्षी हरभजन सिंगने क्रिकेमधून निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर तो राजकारणात जाणार अशी चर्चा सुरु झाली होती. “मी प्रत्येक पक्षाच्या नेत्याला ओळखतो. मी राजकारणार प्रवेश करीन तर तुम्हा सर्वांना नक्की सांगेन” असं तो म्हणाला होता. “पंजाबची सेवा करणं माझा उद्देश असून अजूनपर्यंत मी कुठल्या निर्णयाप्रत पोहोचलेलो नाही” असं हरभजनने त्यावेळी सांगितलं होतं.

 

पंजाबमधून राज्यसभेच्या पाचा जागा रिकाम्या होणार आहेत. निवडणूक आयोगाने आधीच निवडणूक तारखांची घोषणा केली आहे. आवश्यकता पडली तर 31 मार्चला मतदान होऊ शकते. राज्यसभेमध्ये आपचे संख्याबळ तीन वरुन आता आठपर्यंत वाढू शकते. पक्षाकडून लवकरच राज्यसभेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

आणखी कथा

तुमची चुकली असेल