नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9595882733 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अहमदनगर अपडेट : धनगरवाडी बायजाबाई जेऊर अहमदनगर या ठिकाणी राहत असलेले श्री.योगेश माळी यांचे महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी सामाज्याचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लागत नाही म्हणुन सिन्नर तहसील कार्यालय शेजारी त्रिशिल्प क्रांतिकारी मैदान या ठिकाणी ३ ऑक्टोंबर रोजी अन्न , पाणी त्याग करुनआमरण उपोषण करणार . – 24NTV News Marathi

24NTV News Marathi

Latest Online Breaking News

अहमदनगर अपडेट : धनगरवाडी बायजाबाई जेऊर अहमदनगर या ठिकाणी राहत असलेले श्री.योगेश माळी यांचे महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी सामाज्याचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लागत नाही म्हणुन सिन्नर तहसील कार्यालय शेजारी त्रिशिल्प क्रांतिकारी मैदान या ठिकाणी ३ ऑक्टोंबर रोजी अन्न , पाणी त्याग करुनआमरण उपोषण करणार .

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील धनगरवाडी बाईजाबाई जेऊर या ठिकाणी राहत असलेला सर्वसाधारण आदिवासी कुटुंबातील श्री.योगेश सूर्यभान माळी या युवकाने महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी समाज्याचे पिढ्यान पिढ्या पासूनचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते आजवर मार्गी न लागल्यामुळे त्याने संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला आव्हान करत  राज्य शासन व केंद्र शासन  यांना येत्या ३ ऑक्टोंबर रोजी सिन्नर तहसील कार्यालय शेजारी त्रिशिल्प क्रांतिकारी मैदानात अन्न , पाणी त्याग करून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

राज्य शासन आणि केंद्र शासन संपूर्ण  आदिवासी समाज्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावत नाही तो पर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका श्री. योगेश माळी यांनी घेतली आहे यामध्ये आदिवासी समाज्याचे सामाजिक प्रश्नासंनदर्भात तसेच धनगर समाज व इतर समाज ST प्रवर्गात आरक्षण मागत आहे या संदर्भात अनेक विविध मुद्दे घेऊन या उपोषणास बसणार आहेत.आदिवासी समाज्याचे खालील मुद्दे या संदर्भात ते उपोषण करणार असल्याची माहिती मिळत आहे 

१) दोडी बुद्रुक या ठिकाणी गट क्र. ५१६ अ ब क ड या जमिनीत सुमारे ३७ आदिवासी कुटुंबांच्या जमिनी आहेत व गावनकाशा देखील आहे  तसे  ७/१२ देखील नावे आहेत परंतु ग्राम पंचायत ,तलाठी ,भूमी अभिलेख यांच्या माहिती प्रमाणे सदर जमीन कुठे आहे हे कोणालाही माहित नाही त्यामुळे चोरी गेलेली जमीन तात्काळ शासनाने सापडून आदिवासी  कुटुंबातील

७/१२ नावे असलेल्या कुटुंबाना देण्यात यावी.

२) गायरान जमीन ,पडीक जमीन ,गावठाण जमीन ,तलावाच्या बाजूस असणारी गाळपेर जमीन पिढ्यान पिढ्या आदिवासी समाज या ठिकाणी वास्तव्यास असून सदर जमीन कसून त्या ठिकाणी शेती व मिळेल ते काम करून स्वताच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे तरी सदर जमिनीचे ७/१२ हे त्या कुटुंबाला शासनाच्या नियमात बसल  तसे तात्काळ देण्यात यावे .

३) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ,गावात ,विविध ठिकाणी राहत्या घराची जागा हि सदर आदिवासी कुटुंबाच्या नावी नसल्याने त्या ठिकाणी त्यांना मंजूर झालेले घरकुल योजनेचा लाभ  मिळत तसेच आदिवासी  कुटुंबाची परस्थिती मागासलेल्या स्वरुपाची असल्याने त्यांना जागा विकत घेणे शक्य नाही त्यामुळे शासनाने राहत्या घराची जागा नावे करून तात्काळ घरकुल योजनेचा लाभ सदर आदिवासी कुटुंब यांना दयावा.

४) अनेक ठिकाणी इतर समाज्याच्या लोकांनी आदिवासी समाजाच्या जमिनी यावर अतिक्रमण केले आहेत अशा जमिनींचे अतिक्रमण काढून त्या मूळ आदिवासी कुटुंब यांना त्वरित देऊन सबंधित समाज्याच्या लोकांवर तात्काळ कार्यवाही करण्यात.

५) आदिवासी समाजातील लोकांना जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी  पन्नास वर्षापुर्वीचा पुरावा लागतो परंतु काही आदिवासी कुटुंबांडे जर पन्नास वर्षापुर्वीचा पुरावा नसेल तर अशा कुटुंबाला पर्याय म्हणुन फक्त आधार कार्डच्या  साह्याने राहत्या जागी पंचनामा करून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.

६) महाराष्ट्रात राहत असलेल्या संपूर्ण समाज्याच्या आर्थिक निकषावर शिधापत्रिका देण्यात याव्या तसेच संपूर्ण आदिवासी समाज्याला देखील फक्त पिवळे शिधापत्रिका यांचे वाटप करण्यात यावे.

७) सद्याची परस्थिती पाहता आदिवासी समाज्यावर होणारे हल्ले व अत्याचार याचा गंभीर विचार करता ( अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ ) अंतर्गत दाखल झालेल्या  गुन्ह्यातील आरोपी यांचा अटकपूर्व व जामीन रद्द करावा तसेच या गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयातून निकाल लागत नाही तोपर्यंत आरोपीस अटकच रहायला हवी.

८) आदिवासी समाज्याच्या मयत झालेल्या स्त्री,पुरुष वेक्तीला दफन करण्याची परंपरा पूर्वीपासून आहे मात्र महाराष्ट्रातील अनेक गावातील आदिवासी समाज्याची पूर्वी स्वतंत्र दफनभूमी देखील होत्या आणि अजूनही आहेत मात्र काही स्थानिक लोकांनी आदिवासी सामाज्यावर दबावतंत्राचा वापर करून त्या ठिकाणी अतिक्रमण केले आहेत व दफनभूमीच्या ठिकाणी दफन केलेल्या आदिवासी मृतदेहांची आज विटंबना झालेली आहेत त्यामुळे आदिवासी दफनभूमीवर अतिक्रमण केलेल्या वेक्तींवर ( अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ ) अंतर्गत गुन्हा दाखल करून सदर दफनभूमीचा ७/१२ उताऱ्याची नोंद करण्यात यावी.

९) महाराष्ट्रातील आजही अनेक शहरात ,गावात मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्त्या आहेत तसेच त्या ठिकाणी लहान लहान मुलांची संख्या देखील जास्त आहे अशा ठिकाणी अंगणवाडीच्या स्थापना शासनामार्फत करण्यात याव्या.

१०) धनगर समाज व इतर समाज हा आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन,मोर्चे,उपोषण करत आहे त्यांना आरक्षण मिळायला हव अस आम्हाला देखील वाटत परंतु आरक्षण देत असतांना आदिवासींच्या  ST मध्ये कोणत्याही निष्कर्षावर आरक्षण देण्यात येऊ नयेत तसेच ST प्रवर्गाचे लाभ धनगर समाज्याला देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा.

अशा विविध मुद्यांवर आधारित हे उपोषण असणार आहे यावेळी संपूर्ण आदिवासी समाज्याला स्वताच्या न्याय हकासाठी लढा देण्यासाठी या उपोषणात सहभागी होण्याचे आव्हान श्री.योगेश भाऊ माळी यांनी संपूर्ण महारष्ट्रातील आदिवासी जनतेला केल आहे .

                                                  

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

तुमची चुकली असेल